पनवेलमध्ये ISRO चा राज्यातील पहिलाच प्रकल्प | New Project of ISRO | लोकमत न्यूज़

2021-09-13 379

पनवेल तालुक्याच्या वेशीवरील रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल कंपनी डबघाईस आल्याने या कंपनीचा काही भाग भारत पेट्रोलियम कंपनी व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) देण्याचे केंद्र सरकारने ठरविल्यामुळे इस्रोमधून होणाऱ्या संशोधनानंतर अवकाशोड्डाणात जमिनीवरून सुटणाऱ्या उपग्रहात रसायनी येथून उत्पादन केलेले इंधन भरले जाणार आहे. यापूर्वी हे इंधन एचओसी कंपनीतून इस्रोला मिळत होते. मात्र इस्रो आता यापुढे स्वत:च या कच्च्या मालाची उत्पादन निर्मिती करणार आहे. या प्रकल्पामुळे पनवेलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार असून भविष्यातील देशाच्या अवकाशझेपेमध्ये पनवेलचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. उपग्रहातील अवकाशोड्डाणात लागणारा एन २ वो फोर याचा कच्चा माल येथे बनविला जात होता. एचओसी कंपनी बंद झाल्याने हा कच्चा माल सुरुवातीच्या काळात इस्रो स्वत:च्या व्यवस्थापनाच्या देखरेखीखाली या प्रकल्पातून बनविणार आहे. राज्यातील हा इस्रोचा पहिला प्रकल्प असणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange

Videos similaires